मोटरमन युनियनचा ओव्हरटाईम करण्यास विरोध; मुंबईकरांची कोंडी कायम?

    11-Feb-2024
Total Views |
mumbai-local-train-updates-central-railway-traffic-motormans-unannounced-agitation-caused

मुंबई :
भायखळा येथे रुळ ओलांडताना झालेल्या मोटरमन मुरलीधर शर्मा यांच्या अपघाती मृत्युच्या एका दिवसानंतर मोटरमन संघटनेने जादा काम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेच्या लोकलवर परिणाम झाला. दरम्यान, हा मृत्यू अपघाती नसून कारवाईच्या भितीपोटी केलेली आत्महत्या असल्याचं म्हणणं रेल्वे कर्मचारी युनियचं आहे. दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास ८८ लोकल ट्रेन सेवेसह सुमारे १४७ गाड्या दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, लहान तांत्रिक बिघाड झाल्यास प्रशासन ज्या प्रकारे वागणूक देत आहे त्याबद्दल मोटरमन यांनी नाराजी व्यक्त केली असून ते जादा काम करून भरपाई देत असले तरी जेथे मोटरमन निर्धारित कामाच्या वेळेच्या दुप्पट काम करतो, असेही मोटरमन चमूचे म्हणणे आहे. त्याचबरोबर, अतिरिक्त कामाच्या तासांबाबत मोटरमनमध्ये असलेल्या साशंकतेबाबत रेल्वे युनियनने प्रशासनाला पत्रही लिहिले आहे.

दि. १० फेब्रुवारी रोजी मुरलीधर शर्मा यांच्या अंत्यसंस्काराला अनेक मोटरमन उपस्थित होते, ते ट्रेनच्या कामकाजासाठी अनुपलब्ध होते. परिणामी, संध्याकाळच्या सुमारास मध्य रेल्वेवरील सुमारे १४७ लोकल्स रद्द करण्यात आल्या. तसेच, अनेक लोकल्स निर्धारित वेळेच्या सरासरी १५-३० मिनिटे उशीराने धावत होत्या तर अनेक ठिकाणी लोकल एका पाठोपाठ एक उभ्या असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली होती.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.