नागपूरकरही घेणार रामललाचे दर्शन! नागपूर-अयोध्या 'आस्था ट्रेन' रवाना

    11-Feb-2024
Total Views |

Chandrashekhar Bawankule


नागपूर :
नागपूर-अयोध्या 'आस्था ट्रेन' रविवारी अयोध्येकडे रवाना झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी प्रवासासाठी निघालेल्या सर्व राम भक्तांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
 
शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर देशभरातून विविध ठिकाणांहून अयोध्येकरिता स्पेशल आस्था ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. यातच आता रविवारी नागपूरहून अयोध्येकरिता पहिली आस्था ट्रेन रवाना झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही ट्रेन रवाना झाली. यावेळी अनेक भाविक रामललाच्या दर्शनाकरिता अयोध्येला गेले आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.