'राष्ट्रीय शेअर बाजारा'च्या एकत्रित महसूलात ८ टक्क्यांची वाढ; एकूण महसूल ३,५१७ कोटी

    11-Feb-2024
Total Views |
NSE’s consolidated Q3 operating revenue up by 25%

मुंबई :  देशाची आर्थिक स्थिती सुधारत असतानाच राष्ट्रीय शेअर बाजारा(एनएसई)नेदेखील गेल्या आठवड्यात मुसंडी मारल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राष्ट्रीय शेअर बाजारकडून चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तीन तिमाहींचा निकाल समोर आला आहे. या नऊ महिन्यात एनएसईच्या एकत्रित नफ्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण महसूल ३,५१७ कोटी रुपये नोंदवला आहे. महत्त्वाचे म्हणजे एनएसईने 'EBITDA' मार्जिन जाहीर केला असून जो मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५२ टक्के आहे.


दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तीन तिमाहीत तब्बल ३ हजार ५१७ कोटी रुपये ऑपरेशन्स माध्यमातून एकत्रित महसूल म्हणून नोंदवण्यात आला आहे. तसेच, सिक्युरिटीजच्या मूल्यावर देय असलेला कर(STT) प्रत्यक्ष कर संकलनात ही वाढ १.५७ टक्क्यांची असून ट्रेडिंग रेव्हेन्यू व्यतिरिक्त, ऑपरेशन्सच्या कमाईला इतर रेव्हेन्यू लाइन्सद्वारे देखील मार्ग दिल्यामुळे मुख्यतः डेटा सेंटर आणि कनेक्टिव्हिटी शुल्क, क्लिअरिंग सेवा, सूची सेवा, इंडेक्स सेवा आणि डेटा सेवा यांचा या महसूलात विशेष समावेश आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.