विद्यापीठांतील डाव्यांची नाटकं

    11-Feb-2024
Total Views |
Left wing play in pune university

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आपल्या शैक्षणिक प्रवासाचे हे अमृतमहोत्सव वर्ष. ‘शिक्षणाचे माहेरघर’, ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी बिरूदे मिरवणार्‍या विद्यापीठाची कधी नव्हे, तेवढी चर्चा अनावश्यक कारणाने गेल्या काही दिवसांपासून होते. पण, ही चर्चा जाणीवपूर्वक केली जातेय का? का काही कुणी घडवून आणण्यासाठी, अदृश्यपणे काम करते आहे? यामागे काही राजकीय प्रपोगंडा आहे का? याचे यानिमित्ताने चिंतन...

२ फेब्रुवारीच्या घटनेचा साक्षीदार म्हणून..

विद्यापीठाचा ललित कला हा कला, नाट्य, संगीत शिक्षण आणि प्रशिक्षण देणारा विभाग. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा ’जब वुई मेट’ हा परीक्षा प्रयोग प्राध्यापक विद्यार्थी आणि कलाप्रेमी या सर्वांच्या समोर सुरू असताना, प्रयोगाच्या सुरुवातीलाच अश्लील भाषेचा आधार घेऊन राम, सीता, लक्ष्मण आणि रावण ही पात्रे विनोदासाठी खालची भाषा, लक्ष्मण-सीता यांना विसंगत उपमा आणि गलिच्छ शिव्या, ’भागा भागा राम भागा’ हे न पटणारे पार्श्वगीत, त्यातच ज्यावेळी सीतेच्या तोंडी सिगारेट आले, त्यावेळी अनेक सज्ञान प्रेक्षकांना आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांना न पटल्याने प्रयोग थांबविण्यात आला.

ज्यावेळी अभाविपचे कार्यकर्ते आणि काही विद्यार्थी कला मंचावर गेल्यावर, ललित कलाच्या आक्रमक विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूटिंग करणार्‍या सामान्य विद्यार्थ्याला धक्काबुक्की केली, त्याचवेळी बाचाबाची झाल्यानंतर ललितच्या विद्यार्थ्यांनी काठ्या, टिकाव, रॉड काढून हिंसक प्रतिक्रिया देऊन काहींना मारहाण केली. अर्थात हंगामा होणार, याची पूर्वकल्पना असल्यानेच, त्यांनी पूर्वतयारी केली असावी.

याचा व्हिडिओ आणि रुग्णालयाची देयके याचा पोलिसांनी ’एफआयआर’ नोंद करताना आधार घेतला. यात राजकीय संधी दिसतात, हिंदूविरोधी संघटना आणि त्यांनी पाळलेली मीडिया यांनी उलटच अभाविपने मारहाण केली, असा कांगावा केला. म्हणजेच ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ ही परिस्थिती.

अभाविपने आणि रामावर आस्था असणार्‍यांनी केवळ प्रा. भोळे व कलाकारांनी माफी मागावी व प्रकरण मिटते घ्यावे, असा पवित्रा घेतला. मात्र, दिलगिरी व्यक्त न करता, उलटच अरेरावी, उर्मट वर्तन करत, तुम्हाला पोलिसांत दाखवू अशा शब्दात घडलेल्या घटनेचे समर्थन केले. परिणामी, विनाशकाली विपरित बुद्धीमुळेच इथे सगळे प्रकरण चिघळले आणि स्वतःच्या कूकर्माचे वाभाडे काढत, विद्यापीठाला बदनाम केले, असो.

यानिमित्ताने काही प्रश्न

हा प्रयोग ललितच्या अंतर्गत परीक्षेचा भाग होता आणि पडद्यामागचे कलाकाराचे आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न होता, असा दावा करण्यात आला. मात्र, अंतर्गत परीक्षा असो वा कलाकारांची पडद्यामागची भूमिकेत हिंदू देवीदेवता किंवा राम हाच अश्लील विनोदासाठी कसा होऊ शकतो! इतकीच धार्मिक चिकित्सक विनोदाची खाज असेल, तर इतरही धर्मांचे कधी विडंबन विनोदासाठी करून तर बघा. मुळातच हिंदू पूर्वापार सहिष्णू असल्यामुळे, द्वेषातून ना ’रडण्याची’ ना गळे चिरण्याची संस्कृती आहे. रामायण, महाभारत ही भारतीय संस्कृतीची प्रत्येक मनुष्यासाठी परमआदर्श ईश्वरीय सद्पुरूष आहेत. अनेकांच्या आस्थेशी, श्रद्धेशी खेळणारी कोणती अभिव्यक्ती असू शकते आणि संविधानाच्या ’कलम १९(१)’ अनुसार अभिव्यक्तीबरोबर काही मर्यादांचेही बंधन आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अप्रत्यक्षपणे अनेकदा हिंदू अस्मिता, संस्कृती यांची विडंबना करण्याचा प्रयत्न होतोय. अनेकदा काही विद्यार्थ्यांनी मौखिक तक्रारही विभागप्रमुखांकडे केली होती. काहींचा विरोध असतानाही, गुणांच्या भीतीमुळे असे प्रयोग करावे लागतात. मात्र, जाणीवपूर्वक काही प्राध्यापक अशा गोष्टी करण्यास पाठबळ देताना दिसतात, असा अनेक विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

विद्यापीठाला ’जेएनयू’ कोण करतंय?

खरं तर ’जेएनयू’लाच रचनात्मक पद्धतीने डाव्यांनी विद्यार्थी चळवळींच्या नावाखाली देशविघातक आंदोलने आणि विशिष्ट धर्म आणि संघटनांच्या द्वेषापोटी नक्षलवाद, दहशतवाद, जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करून, बदनाम करण्याचे महापाप केले. याच कनैय्या कुमार, उमर खालिद, योगेंद्र यादव यांचे याच संघटना आणि विद्यापीठातील अनेक प्राध्यापक आहे. जे त्यांच्या कृतीच्या आणि विचारांचे ते जाहीर समर्थनही करतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातील सिंबोयसिस, मॉडर्न कॉलेज आणि आताची ’एफटीआय’ या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत रामललाच्या प्राणप्रतिष्ठाच्याच वेळेस बाबरी मज्जिदचे समर्थन करून, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जाब विचारता हिंसा केली. म्हणजेच यांना सर्वोच्च न्यायालय, के. के. मोहम्मद यांचा (अडख) रिपोर्टही मान्य नाही. अर्थातच तिथे श्रीराम आहे म्हणून!
 
गेल्या दोन वर्षांपासून अप्रत्यक्षपणे अनेकदा हिंदू अस्मिता, संस्कृती यांची विडंबना करण्याचा प्रयत्न होतोय. अनेकदा काही विद्यार्थ्यांनी मौखिक तक्रारही विभागप्रमुखांकडे केली होती. मात्र, जाणीवपूर्वक काही प्राध्यापक पाठबळ देताना दिसतात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. प्रयत्न करून बदनाम करण्याचे महापाप केले. कनैय्या कुमार, उमर खालिद, योगेंद्र यादव यांचे या संघटना आणि विद्यापीठातील अनेक प्राध्यापक आहेत. जे त्यांच्या कृतीच्या आणि विचारांचे ते जाहीर समर्थनही करतात. गेल्याच वर्षी विद्यापीठांतील प्रश्नांच्या नावाखाली आंदोलनात दिल्लीत ’मोदी सरकारसे आजादी, हिंदुत्व से आजादी’च्या घोषणा दिल्या गेल्या. स्वतंत्र भारतात आजादी ओरडत, यांना काय कोणती आजादी पाहिजे, यातील छुपा अजेंडा लक्षात घेणे गरजेचे.

भ्रमित राजकारण

अनेक वेळा तथाकथित डाव्या संघटना विनाकारण विद्यापीठाच्या प्रशासनाला वेठीस धरून राजकीय संघटनांचा आणि नेत्यांचा हस्तक्षेप करून फक्त मीडियात पोकळ हवा करण्यासाठी काँग्रेस आणि मार्क्सवादी तसेच आंबेडकरांच्या साहित्याचा विपर्यास करून, हिंदूविरोधी प्रक्षोभक वक्तव्ये करणारे आणि विद्यापीठातील कर्मचार्‍यांचा अरेरावी करत, अपमान करून राजकीय स्टंट करणार्‍यांचा, विद्यापीठ अड्डा होतोय का, याची चिंता वाटायला लागली आहे. कारण, आठ ते दहा वर्षं विद्यापीठात केवळ अभ्यासाच्या नावाखाली घालवायचे. अनावश्यक विषयात ’पीएचडी’ करून, सरकारची शिष्यवृत्ती लुटायची. माफक दरात वसतिगृह मिळते आणि आता फुकटचे भोजनही. विद्यार्थी नेता मिरवून राजकारणाच्या स्वप्नात रमत, स्वतः बरोबर कुटुंबालाही उद्ध्वस्त करून, आपली बौद्धिक दिवाळखोरीची कमतरता झाकण्यासाठी नोकर्‍या कुठे आहे, म्हणत पुन्हा केवळ आजच्याच सरकारला दोष देत, प्रत्येक दिवस आविर्भावात काढायचा, हाच यांचा दिनक्रम.

छुपा अजेंडा

नाटक, लोकगीत, व्याख्यानमाला, चर्चासत्र यांतून अनेकदा अनेक विभागांमध्ये डाव्या विचारधारा असणार्‍या वादग्रस्त लेखक आणि विचारवंतांची व्याख्याने विद्यार्थ्यांच्या माथी मारून, त्यांना केवळ क्रांतीची भाषा शिकवून, वैचारिक हिंसक बनवण्याचा प्रयत्न होतोय. विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवताना, डाव्याच विचारवंतांची हिंदूविरोधी लेखकांचीच पुस्तके का निवडली जातात? हा फार विचार करून, व्यवस्थेवर वर्चस्व तयार करण्याचा डाव आहे, यात तीळमात्र शंका नाही.

युवकांच्या बौद्धिक नवनिर्मितीसाठीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच प्राध्यापक डाव्या विशिष्ट द्वेषात्मक राजकीय विचारांचा पट्टा गळ्यात घालून, नव्या पिढीला भ्रमित करत आहेत. मात्र, गुणांचा प्रश्न असल्याने विद्यार्थी सज्ञान असूनही शांत राहतो; कारण व्यक्तिगत भविष्याचा प्रश्न असतो.

विद्यापीठात अनेक वेळा हिंदू धर्माच्या उत्सवांना सहजासहजी परवानगी विद्यार्थ्यांना दिली जात नाही. गणेशोत्सवात ज्ञानोबा, तुकोबाचा विचार मांडणार्‍या वारकरी संप्रदायाच्या युवा कीर्तनकारांचेही कीर्तनही विद्यापीठ प्रशासन आणि काही हिंदूद्वेषी विद्यार्थी संघटनांनी होऊ दिले नाही. उलटपक्षी पोलीस कारवाईचा इशारा दिला.

दि. २२ जानेवारीला देश दिवाळीप्रमाणे उत्साहात असताना, विद्यापीठात राम मंदिराच्या सदिच्छा संदेशाची पत्रक वाटताना ही विरोध केला. त्या दिवशी काळी वस्त्र, रिबीन बांधून मांसाहाराच्या पार्ट्या करून, स्टेटस ठेवून अप्रत्यक्षपणे भावनात्मक डिवचवण्याचा प्रयत्न करून, अनेकांना काय साध्य करायचे आहे, कोणते प्रति आव्हान ते देऊ पाहत आहे?

अक्षरशः धार्मिक किंवा जातीय आधार घेऊन, काही प्राध्यापक, कर्मचारी विद्यार्थ्यांशी असंतुलित वागणूक देतात, प्रशासकीय कामे करण्यासाठी लाच मागितली जाते व लाच घेणार्‍याला रंगेहात पकडल्यावर काँग्रेसप्रणित कामगार संघटना त्याच्या बचावाला लगेच धावून येते, म्हणजे याला पाठीशी कोण घालते हे स्पष्ट होते.

’श्री शंकर महाराज ट्रस्ट’ गरीब, वंचित विद्यार्थ्यांना एक वेळ मोफत जेवण वाटप करत असतानाही, विद्यार्थी हित न बघता काँग्रेस आणि डाव्या संघटनांनी जाणीवपूर्वक एका विशिष्ट हिंदू धर्माचे म्हणून प्रचंड विरोध का केला? गेल्याच दोन महिन्यांपूर्वी संविधानिक पदावरील पंतप्रधानांबद्दल अतिशय खालच्या भाषेत भिंतीवर व्यक्तिगत टिप्पणी सर्वसामान्य कुटुंबातील शिकायला आलेला विद्यार्थी एकटा कसा करू शकतो, यामागे नेमकी कोण? आणि याचे खुले समर्थनही केले जाते! संविधानिक सरकार व व्यवस्था असतानाही, राजकीय आदर्शवादी सिद्धांताची मोडतोड करून, विद्यार्थ्यांच्या मनात अन्यायाची भावनेला चिथावणी देऊन, त्यांना वैचारिक द्वेषात्मक हिंसक कोण करतंय?? सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा ’ब्रेन वॉश’ करून, रामायण-महाभारत, भारतीय संस्कृती आणि परंपरा विचारधारा कल्पोकल्पित आहेत, ही चर्चासत्र आयोजित याच विद्यापीठात का होतात?

संविधानाचा कांगावा करणार्‍यांनी, दुसर्‍याच्याही मूलभूत स्वतंत्र, हक्क, अधिकार यांचा अभ्यास करावा.केवळ समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य यांच्या पोकळ वल्गना ढोंगी वाटतात आणि त्या तुमच्या चेहर्‍यावर ही दिसतात. याच कपटी अजेंड्याचा शोध जागृत समाजाने आणि व्यवस्थेने वेळ असताच घेणे अत्यावश्यक आहे.

म्हणून आपल्याला कोणता व्यक्ती, समाज निर्माण करून पुढील पिढ्यांची दिशा आणि दशा ठरवण्यासाठी रावण नाही, तर राम आणि रामच दीपस्तंभ आहे! केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारण्यापेक्षा, अभिव्यक्तीचा स्वैराचार करून धार्मिक आणि जातीय मानसिकता शैक्षणिक वातावरणाला दूषित करून, युवकांच्या आयुष्याशी गलिच्छ खेळतेय, हे नक्की.
 
खरं तर राम हा धार्मिक आस्था आणि श्रद्धा यांच्याही पलीकडे व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय प्रेरणास्रोत राहिला आहे. राजकीय सत्तेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्याच्या चळवळीत महात्मा गांधी ते श्रीरामांपर्यंत. सामाजिक सुधारणेत स्वामी दयानंद सरस्वतीपासून ते विवेकानंदापर्यंत. धार्मिक सुधारणेत कबिरांपासून ते वारकरी संप्रदायापर्यंत अनेकांच्या केंद्रस्थानी श्रीरामच आहे. ज्या मूलभूत हक्कांचा आज उहापोह केला जात आहे, त्याच संविधानाच्या तिसर्‍या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आंबेडकरांनी राम, लक्ष्मण, सीता यांचे मूळ संविधानावर सुंदर चित्र रेखाटून घेतले आहे. त्याग, तपस्विता, समभाव, एकवचनी, एकनिष्ठी, तत्त्वपरायण, आदर्श पुत्र, पती, पिता, प्रजापती आणि शत्रूही असा हा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अनंत, अनादी, अटळ आणि शास्वत सत्य आहे. म्हणून सूर्याकडे पाहून थुंकणार्‍यांनी, आपल्या चेहर्‍याचे आणि चारित्र्याचे अगोदर आत्मचिंतन करावे!
 
महेश रहाणे
(लेखक राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थी आहेत.)
९८५००१३९८७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.