"योग्य नेते असतील तरच बोला! कोण आहेत संजय राऊत?"

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी काढला राऊतांना चिमटा

    11-Feb-2024
Total Views |

Raut & Thackeray 
 
पुणे : कोण संजय राऊत? कोण आहेत ते? फार मोठे नेते आहेत का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांना चिमटा काढला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
 
पुण्याच्या पोलिसांनी काढलेल्या गुंडांच्या परेडवर संजय राऊतांनी टीका केली होती. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले असता ते म्हणाले की, "कोण संजय राऊत? कोण आहेत ते? कुणी फार मोठे नेते आहेत का? योग्य नेते असतील तर त्यांच्याबद्दल मला विचारायचं. संजय राऊतांबद्दल काय विचारता?" असा टोलाही त्यांनी लगावला.
 
ते पुढे म्हणाले की, "मथुरा, काशी, अयोध्या ही सगळी ठिकाणं आपल्यासाठी खूप पवित्र आहे. ज्याप्रमाणे राम जन्मभुमी निर्माण झाली त्याचप्रमाणे स्वाभाविकपणे लोकांची अपेक्षा आहे की, श्रीकृष्णभुमीचाही विकास व्हावा. ज्याप्रमाणे कायदेशीररित्या मोदीजींच्या माध्यमातून राम मंदिर उभारले गेले, त्याचप्रमाणे कायदेशीररित्या श्रीकृष्णदेखील विराजमान होतील, असा माझा विश्वास आहे."
 
"तसेच काशी विश्वनाथमध्ये आज नवीन कॉरिडर तर बनलाच, याशिवाय तिथे पुजेसाठी परवानगीसुद्धा मिळाली आहे. त्यामुळे देशात एक चांगले वातावरण पाहायला मिळत आहे. सौहार्दपुर्ण वातावरणात आणि कायदेशीररित्या या सगळ्या गोष्टी होत आहेत," असेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.