'मध्य रेल्वे प्रोन्नत अधिकारी असोसिएशन'कडून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा सत्कार

    11-Feb-2024
Total Views |
Central Railway promoted officers association

मुंबई :
मध्य रेल्वे प्रोन्नत अधिकारी असोसिएशनने दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ऑडीटोरिअम मध्ये सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. यामध्ये मागील ५ वर्षांत म्हणजेच जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२४ पर्यंत मध्य रेल्वेच्या मुख्यालयातून आणि मुंबई विभागातून सेवानिवृत्त झालेल्या ७५ रेल्वे अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ व ट्रॅवलिंग ट्रॉली बॅग देऊन सत्कार करण्यात आला. या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या जवळपास १७० अधिकाऱ्यांना कार्यक्रमात येण्यासाठी संपर्क करण्यात आला होता.

समारंभाची सुरूवात असोसिएशनचे पदाधिकारी व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. यानंतर असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी मंगेश काशीमकर यांनी प्रास्ताविक व स्वागतपर भाषणात सर्व उपस्थित सेवानिवृत्त आणि सेवारत अधिकारी यांचे मन:पूर्वक स्वागत करताना कार्यक्रमाचे प्रयोजन विषद केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, हा सत्कार सोहळा म्हणजे आम्हावर तुमचे जे पितृऋण आहे त्याची परतफेड होय.

'मध्य रेल्वे प्रोन्नत अधिकारी असोसिएशन'' चे अध्यक्ष संजीव कुलश्रेष्ठ यांनी कोवीड पश्चात सर्वत्र आलेल्या निराशाजनक वातावरणानंतर ''मध्य रेल्वे प्रोन्नत अधिकारी असोसिएशन' ' ने उभारी घेऊन नव्याने वाटचाल सुरू झाल्याचे स्पष्ट केले. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक उत्तर देताना प्रतिभा गोळे, असोसिएशनने अगत्याने बोलावून सत्कार केल्याबद्दल असोसिएशन व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करताना त्या भावूक झाल्या होत्या.
 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरज बर्डे व जयश्री बोलर यांनी केले. आभार प्रदर्शन सोपान बढे यांनी केले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.