मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव केली फलटण स्थानकाची पाहणी

भविष्यातील विकास आणि प्रकल्पांच्या सद्य स्थितीवर चर्चा

    11-Feb-2024
Total Views |
Central Railway General Manager ram karan yadav on Phalatan statoin visited

मुंबई :  मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी फलटण स्थानकाची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या समवेत फलटण स्थानकाची सविस्तर पाहणी करून फलटण स्थानकाच्या विकासाच्या कामाचा व इतर अनुषंगिक प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यादव यांनी लोणंद ते फलटण गाड्यांचा वेग वाढवणे, बहुप्रतिक्षित फलटण ते बारामती सेक्शन आणि फलटण ते पंढरपूर नवीन मार्गिका सुरू करणे यासह प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत चर्चा केली. NITI आयोगाच्या मंजुरीनंतर पुढील कॅबिनेट समितीच्या बैठकीत विभागाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे कारण प्रकल्पाची किंमत रुपये २००० कोटींपेक्षा जास्त आहे.

तत्पूर्वी यादव यांनी नीरा नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या जागेला भेट दिली जेथे योजनांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. हा पूल ७ स्पॅन गर्डर्ससह बांधला जाणार आहे जो सध्या मध्य रेल्वे वर्कशॉप, मनमाड येथे तयार केला जात आहे आणि तो लवकरच वर्षात तयार होईल अशी अपेक्षा आहे. पुलाच्या बांधकामाचे कंत्राट यापूर्वीच देण्यात आले असून एजन्सी अंतिम (निवड) झाली आहे. निवडलेली एजन्सी प्रकल्पाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री हलवण्याच्या तयारीत आहे.

पाहणीपूर्वी महाव्यवस्थापकांनी माननीय खासदार निंबाळकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली ज्यामध्ये फलटण स्थानकाचा भविष्यातील विकास, फलटण ते बारामती मार्गाची जलद अंमलबजावणी आणि फलटण-पंढरपूर प्रकल्पाची सद्यस्थिती या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अवनीशकुमार पांडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी ((निर्माण), इंदू राणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे तसेच मुख्यालय आणि पुणे विभागातील इतर वरिष्ठ अधिकारीही या पाहणीवेळी उपस्थित होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.