शिक्षकांना निवडणुकीसारखी अशैक्षणिक कामे देऊ नये : अनिल बोरनारे

    11-Feb-2024
Total Views |
BJP Leader Anil Bornare

मुंबई : 
'राईट टू एज्युकेशन' कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना कोणत्याही प्रकारचे अशैक्षणिक कामे देऊ नये असे असताना निवडणुकीच्या कामासाठी जुंपले जात असून या कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे शिक्षक नेते व भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल बोरनारे यांनी सांगितले. याबाबत अनिल बोरनारे हे निवडणूक अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांना भेटणार असून शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी करणार आहेत.

काल रात्री अचानक शिक्षकांना हजर व्हायच्या सूचना शिक्षणाधिकार्यांनी पत्रांवये केल्या त्यामुळे मुलांना शिकवायचं कुणी ? परीक्षा कुणी घ्यायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. यु डायस, मुख्यमंत्री सुंदर शाळा, या सारखी असंख्य कामे सुरू असून शाळेतील परीक्षांचे नियोजन व इतर रोजची ऑनलाईन कामे करावी लागत असल्याने ही कामे सांभाळून निवडणुकीची कामे कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.