सारखं सारखं मुख्यमंत्री नको, आधी संघटना बांधू! अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला

    11-Feb-2024
Total Views | 45

Ajit Pawar


पुणे :
जरा कळ सोसा. सारखं सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री नको. आधी संघटना बांधू ती मजबूत करु, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. रविवारी पुण्यात राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
 
या कार्यक्रमात बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजितदादांचा आणि यशवंतराव चव्हाण यांचा पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या कणाकणात पोहोचवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचं आहे. एवढं जर आपण केलं तर २०२४ च्या विधानसभेत दादांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहाण्याचं आपलं स्वप्न पुर्ण झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही."
 
दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "अजितदादांना मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी अल्पसंख्यांक, भटके विमुक्त, दलित, आदिवासी, ओबीसी या सगळ्यांची शक्ती आपल्याला बरोबर घ्यावी लागेल."
 
यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “बाबांनो दमाने घ्या. जरा कळ सोसा. सारखं मुख्यमंत्री मुख्यमंत्री असं करु नका. आपण पहिल्यांदा आपली संघटना मजबुत करु. ज्या भागात संघटना नाही तिथपर्यंत संघटना पोहोचवू. आपल्याकडे लोक येत आहेत. लोकांना विश्वास वाटतो आहे," असे ते म्हणाले आहेत.





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121