‘आर्टिकल ३७०’ चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेतील ‘या’ अभिनेत्याला ओळखले का?

    10-Feb-2024
Total Views |
 
arun govil
 
मुंबई : आदित्य धार दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यामी गौतम हिची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवून जो ऐतिहासिक निर्णय घेतला होता त्या घटनेची सत्य स्थिती मांडली जाणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या आर्टिकल ३७० या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते अरुण गोविल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसत आहेत.
 
‘आर्टिकल ३७०’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काश्मिरमध्ये घडणाऱ्या घटनांची ह्रदयद्रावक झलक दिसते. यात अरुण गोविल हे पंतप्रधान मोदींच्या भुमिकेत पुलावामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहताना दिसून येत आहेत. तसेच, केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका किरण करमरकर यांनी साकारली आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.