छत्रपती संभाजींच्या रुपात स्वत:ला पाहिल्यानंतर माझ्याच मी पाया पडलो – भूषण पाटील

    10-Feb-2024
Total Views |

bhushan patil 
 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर भव्य पद्धतीने साकारण्याचा विडा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी घेतला आहे. ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिकपटातून छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन उलगडणार आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. चित्रपट प्रमोशनच्या निमित्ताने ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाची टीम माध्यम प्रतिनिधींसह रायगडावर गेली होती. त्यावेळी भूषण पाटील सोबत महाएमटीबीने संवाद साधला असता, “छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपात पाहिल्यावर स्वत:च्याच पाया मी पडलो होतो”, असे भूषण यांनी म्हटले.
 
अभिनेते भूषण पाटील म्हणाले की, “छत्रपती संभाजी महाराजांच्या रुपात ज्यावेळी मी स्वत:ला पहिल्यांदा पाहिले त्यावेळी स्वत:च स्वत:च्या पाया पडावे अशी ती भावना होती. कुणी पाहत नसताना मी स्वत:ला नमस्कार देखील केला आहे. कारण तो नमस्कार किंवा ती मानवंदना ही माझ्यात दिसणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना करत होतो”.
 
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र भरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूषण पाटील, तृप्ती तोरडमल, मृण्मयी देशपांडे, चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, अभिजीत श्वेतचंद्र, बिपीन सुर्वे यांच्या महत्वपुर्ण भूमिका आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.