ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती अस्वस्थ, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

    10-Feb-2024
Total Views |

mithoon 
 
कोलकता : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृती अचानक बिघडली असल्यामुळे त्यांना कोलकात्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
 
 
 
मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोलकतामधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “ते १००% ठीक आहेत आणि हे त्यांचे रुटीन चेकअप आहे,” अशी माहिती त्यांचा मोठा मुलगा मिमोहने यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना माहिती दिली. न्यूरोसर्जन डॉ. संजय भौमिक अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार करत आहेत.
 
दरम्यान, केंद्र सरकारकडून प्रदान केल्या जाण्या पद्म पुरस्कारांच्या यादीत अभिनेते मिथुन यांचे देखील नाव असून त्यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी देशाच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.