हल्द्वानी हिंसाचाराचा प्रत्यक्षदर्शी म्हणतो-कट्टरपंथी देत होते 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा

    10-Feb-2024
Total Views |
Haldwani unrest news

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हल्दवानी येथे न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासन बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी बुलडोझर मेहिमेला सुरुवात केली. परंतु कट्टरपंथी संतप्त झाले आणि त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. यानंतर हिंसाचार, जाळपोळ आणि गोळीबाराचा काळ सुरू होता. पोलीस ठाणे आणि पेट्रोल पंप जाळण्यात आला. या हिंसाचारात वाहनांचे नुकसान झाले. या घटनेदरम्यान दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दगडफेकीदरम्यान त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि काय घडत आहे ते सांगितले होते.

व्हिडीओमध्ये तो असे म्हणताना दिसत आहे की, जेव्हा पोलिसांवर दगडफेक होऊ शकते, तेव्हा तुम्ही आणि मी काय आहोत. व्हिडिओमध्ये तो म्हणतो, “हे बंधुत्व आहे. चला, मी तुम्हाला बंधुत्व दाखवतो.” पोलिसांवर कशी दगडफेक केली जाते हे त्यांनी कॅमेऱ्यात दाखवले. दरम्यान एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ व्हायरल झालेल्या व्यक्तिचे नाव दीपांशू. हा व्हिडिओ दि. ८ फेब्रुवारी संध्याकाळी ५ वाजता नंतरचा आहे.

दीपांशुच्या म्हणण्यानुसार, त्यांनी पाहिले की १००-१५० महिला कर्मचारी जीव वाचवण्यासाठी हेल्मेट घालून पळत आहेत. सरकारी विभागातील बहुतांश अधिकारी जखमी झाले असून, काहींच्या डोक्यातून, काहींच्या पायातून तर काहींच्या हातातून रक्तस्त्राव होत होता. ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या जात होत्या. काँग्रेस आमदार सुमित हृदयेश अजूनही दंगलखोरांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासनाने कोणावरही अत्याचार केला नाही, उलट त्यांनीच हिंसाचार घडवून आणला. दीपांशू फोटोग्राफीचे दुकान चालवतो. हल्दवानी डीएम वंदना सिंह यांनी सांगितले होते की, पोलिसांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतर हल्द्वानीच्या बनभूलपुरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.