एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत

२५ कोटींची लाच मागितल्याचा गुन्हा वानखेडेंविरूद्ध ईडीतर्फे नोंदवण्यात आला आहे

    10-Feb-2024
Total Views |

Sameer Wankhede
 
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे अडचणीत
 

२५ कोटींची लाच मागितल्याचा गुन्हा वानखेडेंविरूद्ध ईडीतर्फे नोंदवण्यात आला आहे
 

मुंबई: सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाहरूख खानच्या कुटुंबाकडून आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात २५ करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इनफोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी) म्हणजेच केंद्रीय संस्था अंमलबजावणी संचनालयाकडून वानखेडेंवर हा ठपका ठेवण्यात आला असून पीएमएलए (प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
 
अंमली पदार्थांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या शासकीय यंत्रणा एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) च्या काही माजी अधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आपला प्रतिबंधात्मक बचाव करण्यासाठी करण्यासाठी समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. स्टार किड आर्यन खानला जहाजावरील पार्टीत ड्रग्स घेताना पकडल्याचा दावा वानखेडे आणि एनसीबीकडून करण्यात आला होता. परंतु नंतर या प्रकरणात आर्यन खान याला क्लीन चिट मिळाली होती. यापुढील चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्याचा दावा केला जात आहे.
 
२०२१ मध्ये एका साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार वानखेडे व त्यांच्या साथीदारांनी २५ कोटींची मागणी खान यांच्याकडे केली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांचा तपास चालू होता. यादरम्यान चौकशी सुरू असताना एनसीबी यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी संपल्यानंतर सीबीआयकडे वानखेडेंविरूद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली होती.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.