छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी!

    10-Feb-2024
Total Views |

Bhujbal


नाशिक :
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आले आहे. नाशिक येथील त्यांच्या कार्यालयात हे धमकीचे पत्र आले. या पत्रात त्यांना ठार मारण्याच्या कटाबद्दल संपुर्ण माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भुजबळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
 
याविषयी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, "गेल्या काही महिन्यांमध्ये चार पाचवेळा हे पत्र आलेले आहेत. हे सगळे पत्र पोलिसांना पाठवले आहेत. धमकीचे मेसेज आणि फोनही भरपूर आलेत. आयुष्यात खुपदा धमकीचे पत्र आले आहेत आणि प्रयत्नही झालेत. परंतू, आपण हे सगळं पोलिसांवर सोडून द्यायचं. आपण घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली भुमिका बदलू शकत नाही. आम्ही पोलिसांकडे सगळी माहिती पाठवली आहे आणि ते त्याचा शोध घेतील," असेही ते म्हणाले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.