JNU मध्ये डाव्यांची मुजोरी! विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला

    10-Feb-2024
Total Views |

JNU ABVP

नवी दिल्ली : शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रात्री उशिरा दोन गटांत हाणामारी झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
साबरबती ढाब्याजवळ निवडणुकीपूर्वी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अभाविप आणि डाव्या गटांमध्ये हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. डाव्या संघटनांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे अभाविपच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे, तर अभाविपच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे डाव्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
 
जेएनयुतील अभाविप ग्रुपने आपल्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जेएनयूमधील निष्पाप विद्यार्थ्यांवर डाव्या गटांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात विद्यार्थ्यांसह अनेकजण जखमी झाल्याचे अभाविपकडून सांगण्यात येत आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.