अरुण योगीराज यांनी सांगितले रामललांची मूर्ती तयार करताना लागलेल्या 'त्या' २० मिनटांचे महत्त्व!

01 Feb 2024 14:54:06
Arun Yogiraj On Ram Lalla Murti
 
नवी दिल्ली : रामललांची अयोध्येत दि.२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाली. रामललाची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे. त्यानंतर अयोध्येतच रामललाची मूर्ती बनवण्याची प्रेरणा मला मिळाल्याचे अरुण योगीराज यांनी सांगितले. संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध करणारे रामललाचे डोळे तयार करण्यासाठी त्यांना फक्त २० मिनिटे लागली. वास्तविक, त्यांनी एका खास क्षणी रामललाचे डोळे साकारले होते.

अरुण योगीराज यांनी माध्याशी साधलेल्या संवादात सांगितले की, “पहिले दोन महिने मला रामललाचा चेहरा कसा बनवायचा हे समजत नव्हते. ते दिवाळीचे दिवस होते आणि मी अयोध्येत होतो. मी इथे मुलांना सण साजरा करताना पाहिले, त्यांचे चेहरे पाहून मला रामललाचे श्रीमुख काढण्याची प्रेरणा मिळाली.”

अरुण योगीराज पुढे म्हणाले, “रामललाच्या डोळ्यांसाठी माझ्याकडे फक्त २० मिनिटे होती. ही वेळ शुभ मुहूर्तानुसार होती.” डोळे बनवण्याचा पवित्र विधीही त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “डोळ्यांचे शिल्प बनवण्याचे काम सुरू करण्यापूर्वी मला सरयू नदीत स्नान करून हनुमान गढी आणि कनक भवन येथे पूजेसाठी जायचे होते. याशिवाय, कामासाठी मला सोन्याचे दगडी कातर आणि चांदीचा हातोडा देण्यात आला. मी खूप गोंधळलो होतो कारण मला १० प्रकारचे डोळे कसे बनवायचे हे माहित होते. मग मी त्याचे डोळे केले, जे चमकत आहेत.”
 
रामललाच्या मूर्तीबद्दल बोलताना अरुण योगीराज अनवाणी बसलेले दिसले. ते म्हणाले की, जगाला राम दाखवण्याआधी स्वतःला राम मूर्तीत आहे, असे मानावे लागणार होते. त्यामुळे मला जगाला रामललांना दाखवण्याआधी स्वत: ला त्यांना बघायचे होते. मी त्यांना म्हणयचो, प्रभु मला दर्शन द्या. तर, देव स्वतः मला माहिती गोळा करण्यात मदत करत होता. दिवाळीत मला काही माहिती मिळाली.मला सापडलेली काही छायाचित्रे ४०० वर्षे जुनी आहेत. दरम्यान हनुमानजीही आमच्या दारात यायचे, दार ठोठावायचे, सगळं बघायचे आणि मग निघून जायचे, अशी भावना ही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या विस्मयकारक अनुभवांची माहिती देताना ते म्हणाले, “मूर्ती बनवताना रोज संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत एक माकड त्या ठिकाणी येत असे, सर्व काही पाहून ते निघून जायचे. कडाक्याच्या थंडीत आम्ही दरवाजे बंद करू लागलो. हे पाहून तो पटकन दार उघडायचा, आत यायचा, बघायचा आणि निघून जायचा. कदाचित त्यालाही प्रभू रामांना बघायचे असेल. "
 
Powered By Sangraha 9.0