ऍसिड हल्ला झालेल्या मंगलाची सत्य कथा रुपेरी पडद्यावर झळकणार, शिवाली परब साकारणार प्रमुख भूमिका

09 Dec 2024 12:34:26
 
mangala
 
 
मुंबई : जर्मन तत्वज्ञ फ्रेडरिक यांनी 'देव मेलाय' असे वादग्रस्त विधान केलं होतं, हो पण या विधानाला अनेकांनी खोडून काढत प्रचितीची अनेक उदाहरण जगासमोर दाखल केली. नशिबाच्या गोष्टी, नियतीने आखलेले खेळ या सगळ्यांतून जात प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो. आयुष्यात आलेल्या अनेक संकटांचा निडरपणे सामना करण्याचं धैर्य हा देवचं देतो, त्यामुळे जर्मन तत्वज्ञने केलेलं हे विधान अर्थात चुकीचं म्हणावं लागेल. ती लढाई, ती जिद्द, तो खेळ या सगळ्याचा पलिकडे जात जन्मा- मरणाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हो कारण बरेच दिवसांपासून चर्चेत असणारा 'मंगला' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'मंगला' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला.
 
'मंगला' चित्रपटाच्या टीझरने चित्रपटातील रहस्य ताणून ठेवले आहे. ऍसिड हल्ल्याने वाईट वेळ आलेल्या एका गायिकेचा खराखुऱ्या प्रवासाची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. एखाद्याच्या रूपाबरोबर त्यांच्यातील कलेला पुढे जाऊ न देता वाईट सूड घेऊन काही राक्षसी लोकं या चांगल्या कलेला त्रास देतात, हे चित्रपटात पाहायला मिळतेय. मात्र शेवटी विजय हा नेहमीच सत्याचा होतो असं म्हणतात, त्याप्रमाणे खरंच या हल्ल्यातुन त्या गायिकेचा विजय होईल का हे चित्रपट पाहिल्यावरचं कळेल. 
 

mangala 
 
'रैश प्रोडक्शन प्रा.लि' आणि 'फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'मंगला' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. शिवाली परब, शशांक शेंडे, अलका कुबल, डॉ.संजीव कुमार पाटील, विशाल राठोड यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट मंगलाची खरी कथा १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर आणणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0