मुर्शिदाबाद : तृणमूल आमदार हुमायून कबीर यांनी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे नवीन बाबरी मशीद बांधणार असल्याची घोषणा केली. कबीर म्हणाले की, मशीद बांधण्याचे काम हे ६ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू होईल. त्यासाठी दोन एकर जागेवर ट्रस्ट स्थापन केला जाईल, ज्यात मदरशांचे अध्यक्ष आणि सचिव असतील, असा दावा हुमायूनने केला आहे.
मशिदीसाठी उभारण्यात येणाऱ्या निधीची कसलीही कमतरता भासणार नाही, स्वत : एक कोटी रूपये देणार असल्याचेही कबीर म्हणाले. हुमायूनने याचे श्रेय बंगालच्या मुस्लिम समाजाच्या भावनांना दिले. ते म्हणाले की, नवीन मशीद देशाला संदेश देईल की बाबरी ढाचा पाडल्यानंतरही त्यांची संस्कृती आणि ओळख अबाधित आहे.
हुमायून कबीर यापूर्वीही आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी भाजपच्या काही प्रवक्त्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते.