जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा अहवाल अद्याप न्यायालयात सादर नाही, संभल हिंसाचार प्रकरणात ४ जण गजाआड

09 Dec 2024 13:17:11

Jama Masjid survey
 
संभल : उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यतील पोलिसांनी रविवारी २३ नोव्हेंबर २०२४ झालेल्या हिंसाचारात समील असलेल्या अन्य ४ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनाने दगडफेक करणाऱ्यांचे फोटो आता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेकडो हल्लेखोर आपली घरे सोडून इतर राज्यात लपले आहेत. त्यांच्या शोधासाठी छापे टाकण्याच येत आहेत. कोर्ट कमिशनरच्या प्रकृती अस्वास्थामुळे ९ डिसेंबर रोजी न्यायालयाच अहवाल दाखल करत आला नसल्यचे सांगण्यात येत आहे.
 
प्रसारमाध्यमानुसार, २३ नोव्हेंबर रोजी हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या इतर ४ आरोपींपैकी २ जणांना कोतवाली नगर आणि २ जणांना नखासा पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आली. याप्रकरणात तन्वीर आणि शारिकला अटक केली आहे. हे दोघेही संभल येथील कोट भागातील रहिवासी आहेत. हिंसाचाराच्या वेळी पोलिसांनी गोळा केलेल्या सीसीटीव्हीवरून दोन्ही आरोपींची ओळख पटली. मात्र, तन्वर आणि शारिक यांना पोलीस ओळखणार नाहीत, असा समज होता. मात्र अखेर त्यांना ८ डिसेंबर २०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.
 
२३ नोव्हेंबर रोजी संभळ येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या अन्य दोन आरोपींना नखास पोलीस ठाणे पथकाने अटक केली आहे. अनस आणि सुफियान अशी त्यांची नावे आहेत. दोघेही संभल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. यांनीच पोलीस अधिक्षक जनसंवर्क अधिकाऱ्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला आहे.
 
यातील काही बंडखोर हे पळून गेले असल्याने त्यांचे सीसीटीव्ही फुटेज, पोलिसांची स्वत:ची व्हिडिओग्राफी आणि इतर पुरव्यांच्या आधारे त्यांची ओळख पटली आहे. या सर्वांचे फोटो जारी करण्यात आले आहेत. पोलीस संभाव्य ठिकाणांवर छापे टाकत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0