“माझ्यावर बायोपिक आला तर…”; धर्मेंद्र यांनी 'या' अभिनेत्याला दिली पसंती

09 Dec 2024 15:35:40
 
dharmendra
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी ६०-७० च्या दशकापासून गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाची ८५ वर्ष ओलांडली असली तरी त्यांचा उत्साह आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' या दोन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारली होती. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आवर्जून भेट दिली होती. दरम्यान, आफल्या जीवनावर बायोपिक आल्यास त्यात कोणी भूमिका साकारावी असा प्रश्न विचारला असता धर्मेद्र यांनी एका कलाकाराचे नाव घेतले आहे.
 
धर्मेंद्र यांच्या जीवनावर जर का बायोपिक आला तर आपली भूमिका कोणी साकारावी याचा खुलासा त्यांनी केला आहे. धर्मेंद्र यांनी त्यांची मुलं सनी, बॉबी देओलकडे बोट न दाखवता सलमान खानने माझी भूमिका साकारली पाहिजे असे म्हटले आहे. “माझ्या बायोपिकसाठी सलमान हा चांगला ऑप्शन असेल”, असं धर्मेंद्र म्हणाले आहेत.
 
२०१८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत धर्मेंद्र यांना याविषयी विचारण्यात आलं होतं. तेव्हा धर्मेंद्र म्हणाले की, "मला वाटतं की सलमान खान माझ्या बायोपिकमध्ये माझी भूमिका चांगली करु शकेल. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. याशिवाय सलमानच्या काही सवयी माझ्यासारख्या आहेत. तुम्ही सर्व सलमान आणि चांगल्या सवयींना चांगलंच ओळखता." अशाप्रकारे धर्मेंद्र यांनी त्यांच्या बायोपिकमध्ये सलमान खानने भूमिका करायची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, यापूर्वी सलमान खान आणि धर्मेंद्र यांनी ‘प्यार किया तो डरना क्या?’, ‘यमला पगला दिवाना’ अशा काही चित्रपटांमध्ये एकत्रित काम केलं होतं.
 
 
 
Powered By Sangraha 9.0