विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांचा अर्ज दाखल

08 Dec 2024 12:11:15

rahul narvekar
 
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. महाविकास आघाडीच्या दिग्गजांना पराभवाची धूळ चारत, महायुतीने विधानसभेचे मैदान मारले आहे. अशातच आता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून. निवडून आलेल्या उमेदवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम सुरू आहे. विरोधकांनी दिनांक ७ डिसेंबर रोजी या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातला. घडामोडींच्या याच धमश्चचक्रीत आता राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधिमंडळ सदस्य ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी विधिमंडळ सदस्य तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सदस्य चंद्रकांतदादा पाटील आदी उपस्थित होते. येत्या ९ डिसेंबर रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल. राहुल नार्वेकर यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये मोठ्या कौशल्याने विधानसभेचे कामकाज हाताळले होते. याच पार्श्वभूमीवर ते पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्याची चिन्हं आहेत.

 
Powered By Sangraha 9.0