संत शक्ती आणि सज्जन शक्ती यांना प्रणाम करून आमदार मंगल प्रभात लोढा यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

    08-Dec-2024
Total Views |
Mangal Prabhat Lodha

मुंबई : मलबार हिल मतदार संघातीचे आमदार मंगल प्रभात लोढा ( Lodha ) यांनी आज विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. मंगल प्रभात लोढा यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेतली. आज भारताचा विश्वगुरु म्हणून उदय होत असताना या प्रवासात संत शक्ती आणि सज्जन शक्तीचे योगदान उल्लेखित करण्याचा उद्देश मंगल प्रभात लोढा यांनी साध्य केला.

२०२४ सालातील विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदार संघातून मंगल प्रभात लोढा यांची पुन्हा एकदा आमदार म्हणून निवड झाली. मलबार हिल मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास दाखवला. ३० वर्षांपेक्षा जास्त काळ मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल मधील नागरिकांसाठी जनसेवक म्हणून कार्य केले आहे. नागरिकांच्या विश्वासस सार्थ करण्यासाठी समर्पणाने कार्य सुरू राहील हा विश्वास नागरिकांना मंगल प्रभात लोढा यांनी दिला.