१० लाख रोकड अन् चार किलो सोने दुप्पट करण्याच्या आमिषाला पडला बळी अन् झाला घात

07 Dec 2024 13:29:10
 Shamima

तिरुवनंतपुरम : ( Black Magic ) केरळ येथील कासरगोडमधील स्वत:ला 'जिन्न' समजणाऱ्या महिलेच्या एका टोळीने सोन्याच्या हव्यासापोटी काळी जादू करत एका NRI व्यापाऱ्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांची टोळी काळ्या जादूच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होती. पोलिसांना तब्बल २० महिन्यांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळाले आहे. काळी जादू  करणारी शमीमा आणि तिच्या टोळीला या हत्याकांड प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

कासरगोडमधील पोचक्कड गावात राहणाऱ्या गफूरचा १३ एप्रिल २०२३ ला मृत्यू झाला. त्याचा मृतदेह त्याच्याच घराच्या जवळ सापडला होता. रमजान महिन्यात हा प्रकार घडल्यामुळे त्याचा मृत्यू हा प्राकृतिकरित्या झाल्याचा समज घरच्यांचा झाला. गफूर हा एक NRI व्यापारी होता. त्याची UAEमध्ये ४ सुपरमार्केट आहेत.

शमीमाने गफूरकडून १० लाख रुपये आणि त्यासोबत ४ किलो सोने घेतले होते. ते सोने दुप्पट करुन देण्याचे तिने गफूरला आमिष दाखवले होते. गफूरने आपल्या मुलींसह कुटुंबातील सर्व सदस्यांकडून सोने उधार घेतले होते. ते सोने त्याच्या मृत्यूनंतर कुठेच न सापडल्याने कुटुंबियांना शंका आली, आणि कुटुंबियांनी FIR दाखल केली. पोलिस चौकशीनंतर गफूरच्या बॉडीचे पोस्ट मॉर्टम केल्याने घडलेला प्रकार उघडकीस आला. आपण दिलेले पैसे आणि सोने मागण्यासाठी गफूर शमीमाकडे गेला असता त्याला ते न देता त्याच्यावर शमीमाच्या टोळीने हल्ला केला व त्याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी एकूण २० महिन्यांनंतर या प्रकरणाचा शोध घेऊन शमीमा आणि तिच्या टोळीला NRI व्यापारी गफूर हत्याकांडप्रकरणी अटक केली आहे.

Powered By Sangraha 9.0