शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल! ठाणे जिल्ह्यासह २८ जिल्ह्यांमध्ये उभारणार नवोदय विद्यालये

07 Dec 2024 10:58:42
 
Image
 
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाने नवोदय विद्यालय योजना विस्तारासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा २८ जिल्ह्यांमध्ये ही विद्यालये स्थापन करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत या निर्णयसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले.
 
 
 
देशातील ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा २८ जिल्ह्यांमध्ये ही विद्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण अंदाजे २३५९.८२ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. हा निधी २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीत खर्च केला जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे.
 
आतापर्यंत देशभरात ६६१ मंजूर नवोदय विद्यालये आहेत. यापैकी २० जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून त्याठिकाणी दोन नवोदय विद्यालये आहेत. तसेच देशात ३ विशेष नवोदय विद्यालये आहेत. देशभरातील ६६१ नवोदय विद्यालयांपैकी ६५३ विद्यालये कार्यरत आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0