धर्मगुरुंच्या भेटीगाठी; युनुस सरकारचा दिखावा!

06 Dec 2024 16:06:25

Mumannad Yunus Dharmaguru Meeting

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mumannad Yunus Dharmaguru Meeting) 
बांगलादेशात होत असलेल्या हिंदूंवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस यांनी धार्मिक नेत्यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत त्यांनी देशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांची माहिती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पसंख्यांकांवरील हल्ल्याचे वास्तव आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या यात प्रचंड तफावत असल्याचे यावेळी युनुस यांनी म्हटले. मात्र एकूणच प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहूनच, धर्मगुरुंच्या भेटीचा दिखावाच युनुस सरकार करत असल्याची चर्चा सध्या होत आहे.

हे वाचलंत का? : संभळ आणि बांगलादेशातील दंगेखोरांचा डीएनए एकच! : योगी आदित्यनाथ

मिळालेल्या वृत्तानुसार, मुहम्मद युनूस यांनी कोणत्याही विशिष्ट परदेशी माध्यमांचा उल्लेख केला नसला तरी, त्यांच्या अनेक अंतरिम मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी भारतीय माध्यमांवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. परदेशी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या त्यासंदर्भात अचूक आणि योग्य माहिती गोळा करण्यासाठी धर्मगुरुंची बैठक बोलवल्याचे मुहम्मद युनुस यांनी सांगितले. बांगलादेशातील सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे मतही मुहम्मद युनुस यांनी बैठकीदरम्यान मांडले.

Powered By Sangraha 9.0