ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनच्या नात्याबद्दल 'त्या' फोटोने दिले संकेत

    06-Dec-2024
Total Views |
 
bachchan
 
 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. कारण, बराच काळ दोघे कुठल्याही कार्यक्रमांना एकत्रित न दिसल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. मात्र, सध्या एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला असून त्या फोटोमधून अभिषेक-ऐश्वर्यामध्ये सारं काही आलबेल असल्याचं दिसत आहे.
 
ऐश्वर्या आणि अभिषेक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. त्यांच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घेण्यात चाहत्यांना विशेष रस असतो. मागील अनेक दिवसांपासून यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे अनेक कार्यक्रमात हे दोघेही सोबत दिसले नाही. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नातही अभिषेक व ऐश्वर्या वेगवेगळे पोहचले होते.
 

bachchan 
 
मात्र, नुकतंच सोशल मीडियवर ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र असल्याचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक दिसत असून ते अत्यंत आनंदी दिसत आहेत. त्यामुळे आता तरी त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना पुर्णविराम लागेल अशी चिन्ह तुर्तास तरी दिसत आहेत.