मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची हजेरी

05 Dec 2024 18:15:45
 
fadnavis
 
 
 
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याचा कारभार हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. तसेच, कलाकारांनीही आवर्जून या सोहळ्याला हजेरी लावली होती.
 
 
 
 
आझाद मैदानावर संपन्न झालेल्या या भव्य शपथविधी सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यात माधुरी दीक्षित, सलमान खान, शाहरुख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर उपस्थित होते. याशिवाय, उद्योग क्षेत्रातील नामवंत अंबानी कुटुंबीय देखील या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आले होते.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0