मुंबई : (Ajit Pawar) महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला आहे. या शपथविधी सोहळ्यात अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री पद भूषविण्याचा नवा विक्रम रचला आहे. ते पुन्हा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. त्यांना राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शपथ दिली आहे.
अजित पवार १९९१ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, उर्जामंत्री म्हणून काम करण्याचा अजित पवारांकडे दांडगा अनुभव आहे. त्यांच्यासह राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राज्यात आता देवेंद्रपर्वाचा पुन्हा शुभारंभ झाला आहे.