युनुस सरकारची दडपशाही! ५४ इस्कॉनच्या सदस्यांना भारतात प्रवेश करण्यापासून रोखलं

04 Dec 2024 17:57:37

ISKCON
 
ढाका : (Bangladesh) बांगलादेशातील ५४ इस्कॉनच्या सदस्यांना बांगलादेशी इमिग्रेशन पोलिसांनी रविवार, १ डिसेंबरला बेनापोल सीमेवर भारतात प्रवेश करण्यापासून रोखले. या सर्वांकडे वैध प्रवासी कागदपत्रे असूनही त्यांची अडवणूक करत विशेष सरकारी परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी त्यांना परत पाठवले. समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रवाशी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात येणार होते.
 
बेनापोल इमिग्रेशन पोलिस अधिकाऱ्याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, आम्ही पोलिसांच्या विशेष शाखेशी बोललो. जिथून आम्हाला इस्कॉनच्या सदस्यांना सीमा ओलांडू देऊ नका अशा सूचना मिळाल्या. देशातील विविध जिल्ह्यांतील भाविकांचा जत्था भारतात जाण्यासाठी बेनापोल सीमेवर पोहोचला होता. त्यांनी बेनापोल येथे सीमा ओलांडण्यासाठी तासनतास वाट पाहिली, परंतु त्यांना यासाठी विशेष परवानगी नसल्याचे सांगण्यात आले.
 
इस्कॉनचे सदस्य सौरभ तपंदर चेली म्हणाले- आम्ही भारतात आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार होतो, पण सरकारी परवानगी नसल्याचे कारण पुढे करत पोलिस अधिकाऱ्यांनी आम्हाला रोखल्याचे म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0