तिरुपती : आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थान येथे मुमताज हॉटेल बनवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यावरून आता वादाची ठिकणी पेटली आहे. यावेळी तिरूपती संस्थानने 'गो बॅक मुमताज हॉटेल', अशा घोषणाबाजी करत निषेध केला आहे. याप्रकरणी आता मंगळवारी ३ डिसेंबर २०२४ रोजी मोठी निदर्शने दर्शवली आहेत. ज्या जागेवर हॉटेल बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे त्या जागेचे वाटपपत्र रद्द करण्यात आले आहे. मात्र तरीही बांधकाम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी या हॉटेलच्या प्रकल्पास हिंदूंनी विरोध केला आहे. तिरूपती देवस्थान संस्थेने १९ नोव्हेंबर रोजी एका बैठकीत संबंधित जमिनीचे वाटप रद्द केल्यानंतरही काम सुरू असल्याचे सांगितले. जगन मोहन रेड्डी सरकारच्या काळामध्ये ही जमीन देण्यात आली होती. याप्रकल्पामध्ये १०० व्हिला आणि हॉटेल्स बांधली जाणार होती. यामधून सरकारला काही फायदा मिळत असल्याचा आरोप आहे.
याप्रकरणाने हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची माहिती तिरूपती संस्थानने दिली. यामुळे आपले वाटप रद्द केले असल्याची माहिती देण्यात आली. तसेच मध्यंतरी तिरूपती मंदिरात गोमांसासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा वापर हा प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी करण्यात आला होता. त्यानंतर आता मुमताज हॉटेल बांधण्यासाठीच्या प्रकल्पावरून नवीन वाद सुरू झाला.