‘पुष्पा २’ने केला विक्रमी रेकॉर्ड; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटींचा आकडा पार
04-Dec-2024
Total Views |
मुंबई : दिवसेंदिवस दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा प्रभाव वाढत चालला आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणारा पुष्पा २ हा चित्रपट. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका असणाऱ्या पुष्पा १ : द राईज हा चित्रपट २०२१ मध्ये आला होता. याच चित्रपटाचा दुसरा भाग आता प्रदर्शित होणार असून प्रदर्शनापुर्वीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड केला आहे. पुष्पा २ या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने तब्बल १०० कोटी रुपयांचा आकडा गाठला असून राम चरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या ‘आरआरआर’ चित्रपटासह ‘बाहुबली २’चा विक्रमी रेकॉर्ड ‘पुष्पा २’ चित्रपटाने मोडला आहे
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, या चित्रपटाने परदेशात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ३० कोटी कमाई केली आहे, तर देशभरात या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच ७० कोटींची कमाई केली आहे. म्हणजेच आत्तापर्यंत या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाचे संपूर्ण भारतात २८ हजारांहून अधिक शो होणार असून तब्बल २० लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट २डी, ४डीएक्स आणि आय मॅक्समध्ये उपलब्ध असून तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट ‘पुष्पा: द राइज’चा दुसरा भाग असून चित्रपटाच्या पहिल्या भागात पुष्पा आणि श्रीवल्ली या दोघांची प्रेमकहाणी तसेच भंवर सिंह शेखावतबरोबरचे वैर पाहायला मिळाले. आता दुसऱ्या भागात याच चित्रपटाची पुढील कथा दाखवली जाणार आहे.