मुंबई : (Sharad Pawar) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. ६ जानेवारीच्या आत सगळे पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. महाराष्ट्रातील निवडणूकीमध्ये नियम पाळले नसल्याचा दावा शरद पवार गटाच्या उमेदवारांनी केला आहे.
विधानसभा निवडणूकीमध्ये निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आरोप पवार गटाकडून याआधीच करण्यात येत होते. त्याच धर्तीवर आता उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे. ६ जानेवारीपर्यंत शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र भरुन घेतले जाणार असल्याचीही माहिती आहे.