"गांधी कुटुंबातील कुणीही...." भाजपचे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांची काँग्रेसवर टीका

30 Dec 2024 13:18:04

puri
 
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतासाठी समृद्ध अशी कामगिरी करणाऱ्या मनमोहन सिंग यांच्या वाट्याला मात्र, उपेक्षाच आल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी स्मृतीस्थळावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.

माध्यमांशी बोलताना पुरी म्हणाले की ज्या प्रकरे काँग्रेसचे लोक मनमोहन सिंग यांच्या मृत्यूनंतर राजकारण करत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. काँग्रेसच्या नेत्यांना आत्मपरिक्षण करण्याची गरजा आहे. मनमोहन सिंग यांच्या अस्थी स्विकारण्यासाठी गांधी कुटुंबातील कुणीही पुढे आले नाही. केवळ माध्यमांसमोर चमकण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी गांधी कुटुंब आणि काँग्रेसचे लोक पुढे आले होते. वास्तविक त्यांना मनमोहन सिंग यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आदर नव्हता. भाजपचे अमित मालविय यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबासहीत डॉक्टरांच्या अस्थी स्विकारल्या. सिंग यांच्या अंत्यविधीसाठी शीख संगत या संघटनेचे सदस्य सुद्धा उपलब्ध होते. डॉ. मनमोहन सिंग यांचे २९ डिसेंबर रोजी शाही इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0