संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीची कारवाई सुरू! बीडमध्ये काय घडलं?

30 Dec 2024 17:33:16

cid
 
बीड : (Walmik Karad) खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी वाल्मिक कराड हा उज्जैनमध्ये होता, अशी माहिती आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर वाल्मिक कराडची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचबरोबर वाल्मिक कराडच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडच्या पत्नीची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली आहे.
 
सीआयडीचे पथक बीडमध्ये दाखल
 
सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये पोहोचले असून बीडच्या शहर पोलीस ठाण्यात काही जणांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. यावरुन राजकारणही चांगलंच तापलेलं आहे. याचप्रकरणी तपासासाठी सीआयडी पथक बीडमध्ये दाखल झाले आहे. तपासादरम्यान दोन महिलांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
बीड हत्या प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती यांचे राज्यपालांना पत्र
 
बीड मधील हत्या प्रकरणावरून संभाजीराजे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात चर्चेसाठी त्यांनी या भेटीची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांची ही भेट होणार का आणि या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0