मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारला पदभार!

30 Dec 2024 16:54:05

ashish shelar 
 
 
मुंबई : (Ashish Shelar) महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे विजयी आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणून शपथबद्ध झालेले माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला आहे.
 
मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दालन क्रमांक ४०१ मध्ये जाऊन आशिष शेलार यांनी खात्याचा पदभार स्वीकारला. यावेळी दोन्ही खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0