वोट जिहाद भाग २! मालेगाव बनले रोहिग्यांचे आश्रयस्थान

किरीट सोमय्यांचा आरोप

    30-Dec-2024
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
नाशिक : मालेगाव हे आता बांग्लादेशी आणि रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनले असून हा वोट जिहाद भाग दोन असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमवार, ३० डिसेंबर रोजी त्यांनी मालेगाव येथील तहसीलदार आणि महापालिका कार्यालयांची भेट घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
 
 
 
"मालेगाांव येथे वर्षभरात सुमारे १ हजार घसुखोर बाांगलादशी व रोहिंग्या मुसलमानांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आला आहे. मालेगाव तहसील कार्यालय आणि मालेगाव महापालिकेतर्फे त्यांचा जन्म मालेगावात झाल्याचे जन्माचे दाखले देण्यात आले. गेल्या वर्षभरात अशा १ हजार लोकांना तहसीलदारांच्या निर्देशांतर्गत मालेगाव महापालिका आणि ग्रामपंचायत कार्यालयांनी जन्माचे दाखले दिले," असा दावा किरीट सोमय्यांनी केला.
 
ते पुढे म्हणाले की, "जन्म व मृत्यू नोंद कायदा १९६९ मध्ये झालेल्या सुधारणेप्रमाणे नोव्हेंबर २०२३ पासून तहसीलदारांना अशा प्रकारे जन्म दाखले देण्याचे अधिकार देण्यात आले. या कायद्याच्या तरतुदीचा दुरुपयोग करून मालेगावमध्ये एक मोठे रॅकेट सुरु झाले आहे. यात तहसीलदार कार्यालये, महापालिकेचे काही कर्मचारी आणि काही स्थानिक नेते या बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना भारतीयत्व प्रदान करण्याचा कारखाना चालवत आहेत. हा वोट जिहाद भाग दोन आहे," असा आरोपही त्यांनी केला आहे.
 
हे वाचलंत का? - बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाने रद्द करा! सुरेश धस यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
 
अनधिकृत दाखले रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र!
 
किरीट सोमय्या यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणाची चौकशी करण्याबाबत पत्र लिहीले आहे. तसेच असे अनधिकृत जन्म दाखले रद्द करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.