"आधी तिरंग्याला सलाम करा, मगच तुम्हाला उपचार मिळेल"; पश्चिम बंगालच्या डॉक्टरची बांगलादेशींसाठी अट

03 Dec 2024 18:05:10

dr. sekhar
 
कोलकाता : (West Bengal) बांगलादेशात इस्लामिक कट्टरवाद्यांकडून तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात. याचदरम्यान पश्चिम बंगालमधील डॉक्टर्स बांगलादेशींच्या विरोधात उघडपणे मैदानात उतरले आहेत. सिलीगुडीतील एका डॉक्टरांनी आपल्या खासगी दवाखान्यात तिरंगा फडकवत स्पष्ट लिहिले आहे की, जर तुम्हाला त्यांच्याकडून उपचार करुन घ्यायचे असतील तर तुम्हाला तिरंग्याला सलाम करावा लागेल.
 
डॉ. शेखर बंद्योपाध्याय असे या डॉक्टरांचे नाव आहे. ते उत्तर बंगाल मेडिकल कॉलेजमध्ये ईएनटी विभागात विशेष वैद्यकीय अधिकारी आहेत. समोर आलेल्या वृत्तानुसार, त्यांनी आपल्या खाजगी दवाखान्यामध्ये तिरंगा ध्वज लावला असून त्याच्या शेजारी “भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हा आपल्या आईसारखा आहे. कृपया आत प्रवेश करण्यापूर्वी तिरंग्याला सलाम करा. "विशेषत: बांगलादेशी रुग्ण, जर त्यांनी नमस्कार केला नाही तर त्यांना आत येऊ दिले जाणार नाही." असा मजकूर लिहिला आहे.
 
"...भारतात येणाऱ्यांना भारताचा मानसन्मान ठेवावाच लागेल"
 
पुढे ते म्हणाले, “मी काम करत असलेल्या सरकारी रुग्णालयात कोणालाही उपचार नाकारू शकत नाही, परंतु माझ्या खाजगी दवाखान्यामध्ये मात्र जे तिरंग्याचा आदर करू शकत नाहीत त्यांनी माझ्याकडून उपचाराची अपेक्षा करू नये. खरंतर डॉक्टरांनी कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारू नयेत, मात्र भारतात येणाऱ्यांना भारताचा मानसन्मान ठेवावाच लागेल, असे परखड मत डॉ.शेखर यांनी मांडले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0