मुंबई : स्नेहल तरडे दिग्दर्शित आणि प्राजक्ता माळी निर्मित व अभिनित 'फुलवंती' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या कादंबरीवर चित्रपटाचे कथानक आधारित होते. दरम्यान, या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनेही जिंकली आणि बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. दरम्यान, नुकतीच फुलवंती चित्रपटाच्या टीमने हे यश सेलिब्रेट केले असून यावेळी फुला अर्थात प्राजक्ता माळी आणि चंद्रा अर्थात अमृता खानविलकर यांची नृत्याची जुगलबंदी रंगली होती.
'फुलवंती' चित्रपटाच्या पार्टीला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरने 'मदनमंजिरी'या गाण्यावर सुंदर नृत्य केले. चाहत्यांना फुलंवती आणि चंद्राची जुगलबंदी पाहायला मिळाली. तर गायिके वैशाली माडे हीने 'मदनमंजिरी' हे सुरेल गाणे गायले देखील. त्यामुळे उपस्थितांना नृत्य आणि गायनाचा उत्तम कलाविष्कार अनुभवता आला.