छंदाचं रूपांतर करिअर मध्ये करा : अनिल बोरनारे

27 Dec 2024 15:31:01
Anil Bornare

कल्याण : विद्यार्थ्यांनी जोपसलेला छंद करिअर मध्ये रूपांतरित करण्याचे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व शालेय शिक्षण विभागाच्या राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी केले. छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिरच्या ( Abhinav Vidyamandir ) आचार्य अत्रे नाट्यगृहात झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक व माजी विद्यार्थी योगेश पाटील, वनवासी संवाद ट्रस्ट कल्याणचे अध्यक्ष बाबा जोशी, छत्रपती शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य मिलिंद कुलकर्णी विश्वास सोनवणे, निवृत्त सैनिक बसवराज गोवे, (सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन आंधळे सर पाहुणे म्हणून उपस्थित होते. छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले. शिक्षणाला व्यवसायाची जोड देणारं नवीन शैक्षणिक धोरण असून राज्यात लवकरच याची अंमलबजावणी होणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

माजी विद्यार्थी योगेश पाटील यांनी या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून सादर केलेल्या कलागुणांचा तुम्हाला पुढील आयुष्यात उपयोग नक्कीच होईल हे विद्यार्थ्यांना सांगितले. बसवराज गोवे यांनी आपण खूप भाग्यवान आहात एवढ्या मोठ्या हॉलमध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले माननीय श्री आंधळे यांनी शिक्षण, अभ्यास महत्त्वाचाच आहे पण आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो यातूनच एखादा कलावंत तयार होतो हे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत तरटे यांनी विद्यार्थ्यांनी प्रगतीसाठी प्रयत्न करावे. आज शाळा ज्या वास्तूत भरते तिथपर्यंतचा आपण प्रवास केला आहे. आपली ही संस्थेची पहिली शाळा आहे .हे सांगून एक बोधपर कथा विद्यार्थ्यांना सांगितली. सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस तसेच शालेय समितीचे अध्यक्ष निलेश रेवगडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक संपत .गिते यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ तसेच सहशालेय उपक्रमाची कल्पना प्रेक्षकांना दिली अभिनव विद्यामंदिर मध्ये अतिशय गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे सांगितले यावर्षी पाककला स्पर्धेतून भरपूर महिला पालकांनी सहभाग घेतला याबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेतील कलाशिक्षक सुरावकर सर यांनी डिजिटल स्क्रीन चा वापर करून शाळेच्या प्रगतीचा अहवाल वाचून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भोईर सर यांनी केले तसेच पाहुण्यांचा परिचय शाळेतील शिक्षिका आंबेरकर यांनी करून दिला.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलातरंग-२०२४ उत्सव कलेचा या शीर्षकांतर्गत जागरण, गोंधळ, गोविंदा डान्स, पिंगा,हे नृत्य प्रकार ,ती फुलराणी सारखे नाट्य प्रयोग यांसारखे विविध कलाविष्कार सादर करून रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या मध्यंतरात यथोचित व्यक्तींचे सत्कार करण्यात आले.

छत्रपती शिक्षण मंडळाचे कोषाध्यक्ष विश्वासजी सोनवणे सर या यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच शाळेवर प्रेम करणारे माजी मुख्याध्यापक पाठक सर तसेच माजी मुख्याध्यापक श्री आवटे सर यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले माजी शिक्षक आंग्रे सर, दिनकर सर, मुळे सर असे अनेक जण याप्रसंगाचे साक्षीदार होते. तसेच इतर शाळेतील मुख्याध्यापक शाळेचे पालक प्रतिनिधी ,इतर पालक आजी व माजी विद्यार्थी,शाळेचे प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महिला मंडळाच्या दीपाली कुलकर्णी मॅडम अशा सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला व कार्यक्रमाची शोभा वाढवली. सौ. सुप्रिया जोशी मॅडम यांनी केलेल्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Powered By Sangraha 9.0