नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या सिंग यांनी दिल्लीमध्ये आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी गुरशरण कौर आणि त्यांच्या ३ मुली असा परिवार आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवसस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मनमोहन सिंगजी यांच्या बद्दल बोलताना त्या म्हणाल्या की भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या देशसेवेसाठी, निष्कलंक राजकीय जीवनासाठी आणि त्यांच्या नम्रतेसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या जाणण्याने भारताचं मोठं नुकसान झाले आहे.
माजी राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केले. यावेळेस त्यांन सिंग यांचे वर्णन आर्थीक शिल्पकार म्हणून केले. हा देशासाठी खूप मोठा धक्का आहेच, पण त्याच वेळेस माझे वैयक्तीक नुकसान सुद्धा झाले आहे असे मत कोविंद यांनी व्यक्त केले आहे.