'एडीएम'ने अव्वलस्थानासह पटकावला 'शाश्वत कृषि पुरस्कार'

27 Dec 2024 19:42:07
adm


महाराष्ट्र :      निसर्गातून नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करणाऱ्या जागतिक अग्रगण्य कंपनी 'एडीएम'ला भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (एफआयसीसीआय) कडून यंदाचा शाश्वत शेती पुरस्कार मिळाला आहे. ‘शाश्वत स्त्रोत उपक्रम - शेतकरी स्तरावर’ या श्रेणीअंतर्गत देण्यात आलेला हा सन्मान भारतातील लहान शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याच्या व शाश्वततेच्या प्रगत दिशेने 'एडीएम'च्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. विशेष म्हणजे, हा 'एडीएम'चा तिसरा शाश्वत कृषि पुरस्कार असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेला, पर्यावरणीय व्यवस्थापनाला उंचावण्यासाठी समर्पणाचे प्रतीक आहे.

दरम्यान, भारताच्या सर्वात मोठ्या आणि जुन्या उद्योग संघटनांपैकी एक असलेल्या एफआयसीसीआय द्वारे आयोजित शाश्वत कृषि पुरस्कार शाश्वत कृषि विकासाला चालना देणाऱ्या उत्कृष्ट शेतकरी सहभाग कार्यक्रमांना अधोरेखित करतात. या वर्षीचे पुरस्कार "कार्यक्षमता, समावेशकता आणि लवचिकता या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आले होते. ज्यामुळे शाश्वत शेतीतील उत्तम पद्धती आणि नाविन्यपूर्ण उपाय प्रदान करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे.

२०२१ मध्ये महाराष्ट्रातील लातूर, बीड आणि धाराशिव येथे सुरू करण्यात आला होता. बायर क्रॉप सायन्सेस, कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड, स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी) नावाची स्थानिक महिला नेतृत्व करत असलेली स्वयंसेवी संस्था आणि लातूरमधील कृषी महाविद्यालयासह भागीदारांच्या सहकार्याने हाती घेतलेला हा उपक्रम तीन जिल्ह्यांमध्ये ३६,००० हेक्टरवर पसरलेला असून २५,५०० शेतकऱ्यांना जोडत आहे.



 
Powered By Sangraha 9.0