मुंबई : कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीसह त्याची पत्नी साक्षी गवळी यांना २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुरुवारी या दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्या दालनात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.
हे वाचलंत का? - "मनमोहन सिंगांनी न बोलता जे करून दाखवलं ते..."; राज ठाकरेंनी पोस्ट करत जागवल्या आठवणी
आरोपी विशाल आणि साक्षी या दोघांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. हत्या करताना कोणी शस्त्रे वापरले? मुलीचे अपहरण कशाप्रकारे करण्यात आले? आणि आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का? याबाबत अधिक तपास करायचा असल्याचा युक्तीवाद पोलिसांनी कल्याण न्यायालयात केला. दरम्यान, या चौकशीसाठी न्यायालयाने विशाल आणि त्याची पत्नी साक्षीला पोलिस कोठडी सुनावली आहे.