केरळ : नाताळ सणानिमित्त (Christmas) केरळमध्ये १५२ कोटींहून अधिक किंमतीचे मद्य विकले गेले असल्याचे वृत्त आहे. यावरून केरळमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्म असल्याचे दिसून येते. नाताळ सणानिमित्त २४ डिसेंबर २०२४ रोजी ९७ कोटींहून अधिक रूपयांचे मद्य विकले गेले होते. तर नाताळ सणादिवशी म्हणजच २५ डिसेंबर २०२४ रोजी ५५ कोटी रुपयांचे मद्य विकले गेल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच गतवर्षी नाताळ सणाच्या तुलनेत यंदाच्या नाताळ सणादिवशी मद्यविक्रीमध्ये सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १२३ कोटी रुपयांचे मद्य विकले गेले होते. केरळमध्ये ख्रिश्चन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केरळ हे देशातील सर्वाधिक ख्रिस्ती धर्म असलेले राज्य आहे. केरळ येथे सुमारे २० टक्के म्हणजे अंदाजे ६० लाख नागरिक हे ख्रिस्ती धर्माचे पालन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.