'आयसीएआई'कडून सीए फायनलचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० उमेदवार सीए म्हणून पात्र

    27-Dec-2024
Total Views |

Chartered Accountant Results
 
नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया(आयसीएआई)ने सीए फायनलचा निकाल जाहीर केला आहे. या परिक्षेत हैदराबादच्या हेरंब माहेश्वरी आणि तिरूपतीच्या ऋषभ ओसवाल या दोघांनीही प्रथम क्रमांक पटकावला आहे. अहमदाबादच्या रिया कुंजन कुमार शाहाचा दुसरा तर कोलकाता येथील किंजल अजमेराने तिसरा क्रमांक पटकवला आहे. या परिक्षेत एकूण ११ हजार ५०० उमेदवार सीए म्हणून पात्र ठरले आहेत. 
 
हेरंब माहेश्वरी आणि तिरूपतीच्या ऋषभ ओसवाल दोघांनीही ५०८ म्हणजे ८४.६७% गुण मिळवले आहेत. रिया कुंजन कुमार शाहाने दुसरा क्रमांक पटकवला असून तिने ५०१ गुण तर ८३.५० टक्केवारी मिळवली. कोलकाता येथील किंजल अजमेरने ८२.१७ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. 
 
 
 
 
६६ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी सीए ची फायनल म्हणजेच अंतिम परिक्षा दिली होती. त्यात ११ हजार २५३ विद्यार्थी गट - १ ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. तर ४९ हजार ४५९ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५६६ विद्यार्थी गट-२ च्या परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. गट-१ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ही १६.८ टक्के होती, तर गट-२ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी २१.३६ टक्के होती. तर यापैकी दोन्ही गटांचा विचार केल्यास एकूण १३ .४४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  दोन्ही गट मिळून ३० हजार ७६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ४ हजार १३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.