कट्टरपंथी इर्शादने अल्पवयीन युवतीवर बलात्कार करण्याचा रचला कट

27 Dec 2024 13:17:30
 
Irshad
 
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि नंतर हत्येप्रकरणाचे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. याप्रकरणातून संपूर्ण घटना उघडकीस आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोपी इर्शादला अटक करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान याप्रकरणाबाबत महत्त्वाच्या माहितीचा उलगडा करण्यात आला आहे.
 
कट्टरपंथी इर्शादने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न सपशेल अपयश ठरला. त्यावेळी त्याने त्या निष्पाप मुलीची हत्या केली. यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
 
दरम्यान, पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यात पहिल्या व्हिडिओमध्ये मुलगी एका ठिकाणाहून बाहेर पडत असताना दिसते. त्यानंतर तो तरुण मुलीला एका गोणीत घेऊन जातो आणि तिचा मृतदेह एका शाळेच्या परिसरात सापडल्याचे वृत्त आहे.
 
बुधवारी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी वाराणसी येथे एका बंद गोणीमध्ये मुलीला मृतदेह सापडला होता. यावेळी युवती अर्धनग्न अवस्थेत होती. त्या युवतीचा मृतदेह आढळून आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि नंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आहे.
 
पीडित युवती मच्छर मारण्यासाठी वापरली जाणारी कॉईल खरेदी करण्यासाठी बाहेर पडली होती, त्यावेळी हा निंदनीय प्रकार घडला आहे. हा प्रकार रात्री घडला असून युवतीच्या कुटुंबीयांनी युवतीचा शोध घेण्यास सुरूवात केली. रात्रभर शोधमोहिम सुरू होती. मात्र सकाळी या घटनेची माहिती समोर आली.
 
 
Powered By Sangraha 9.0