ऑर्डर केलं पनीर! खायला दिलं चिकन! सपा नेत्याच्या हॉटेलमधील प्रकार

26 Dec 2024 17:26:49

Chicken
 
वाराणसी : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एका हॉटेलमध्ये ९ जणांना पनीर असे सांगून चिकन (Chicken) खाऊ घातल्याची धक्कादायक घटना घडली. जेवत असताना त्याला काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. जेवण करतेवेळी पनीरच्या नावाने चिकन दिल्याचे उघडकीस आले. आता हे रेस्टॉरंट सपा नेत्याच्या मालकीचे असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.
 
यानंतर आता ग्राहकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बराच वेळ वादही झाल्याचे वृत्त आहे. एकूण ९ लोक होते त्याहून ४ जणांनी त्याच रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती सांगण्यात आली. 
 
पीडितांनी सांगितले की, ते वाराणसीतील हॉटेल अद्रिका येथे थांबले होते. त्यातील एकूण ९ लोक संबंधित रेस्टॉरंट येथे आले होते. त्यातील ४ जणांनी पनीर मागवले होते. मात्र, रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांनी पनीरऐवजी चिकन खाऊ घातले. याप्रकरणाची पुष्टी केल्यानंतर मॅनेजर आणि वेटर या दोघांना धारेवर धरण्यात आले. हॉटेलात एकाच पातेल्यात शुद्ध आणि मांसाहर पदार्थ बनवले जातात, असे पीडितांनी सांगितले.
 
दरम्यान, हॉटेलमधील कर्मचारी हे मुस्लिम आहेत. त्यामुळे हा गोंधळ झाला असावा असे आरोप पीडितांनी केले. हे हॉटेल समाजवादी पक्षाचे नेते ओपी सिंह यांचे आहे. यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर ऑर्डर दिलेल्या जेवणाच्या ताटाची आदलाबदल झाल्याचे हॉटेल मॅनेजरने स्पष्टोक्ती दिली.
 
Powered By Sangraha 9.0