पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ५८ लाख SVAMITVA Property Cards चे वाटप

26 Dec 2024 19:03:29

modi swamitva

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने यशाची अनेक शिखरं सर केली आहेत. अशातच आता भारताच्या ग्रामीण सशक्तीकरण आणि प्रशासनाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरलेल्या स्वामित्व (SVAMITVA) मालमत्ता पत्रांचे ई वितरण मोदींच्या हस्ते होणार आहे. २७ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या १० राज्यांतील आणि २ केंद्रशासित प्रदेश-जम्मू आणि लडाख मधील अंदाजे ५० हजार गावांमधील ५८ लाख लाभार्थ्यांना स्वामित्व SVAMITVA मालमत्ता पत्रांचे वितरण होणार आहे.
 
काय आहे स्वामित्व योजना (SVAMITVA) ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल २०२० रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त SVAMITVA योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजनेचे उद्धिष्ट ड्रोन आणि भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील मालमत्ताधारकांना त्यांच्या "मालकीहक्कांच्या नोंदी" प्रदान करणे हे आहे. कोव्हीड काळात आलेल्या सर्व आव्हानांचा सामना करत पहिल्यांदा प्रोपर्टी कार्डस्चे वितरण हे ११ ऑक्टोबर महिन्यात करण्यात आले. आर्थीक सर्वसमावेशकता तसेच शाश्वत विकासाचा विचार समोर ठेवत ही योजना आखण्यात आली.
 
स्वामित्व योजना (SVAMITVA)ची यशस्वी भरारी!
स्वामित्व योजनेमुळे झालेला ग्रामीण भागातील असंख्य कष्टकऱ्यांचे जीवन उजळून निघाले आहेत. ड्रोन मॅपिंगच्या अंतर्गत ३.१७ लाख गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. २.१९ कोटींहून अधिक मालमत्ता पत्रे तयार करण्यात आली आहेत. डिजिटली प्रमाणित मालमत्तेच्या नोंदींमुळे स्थानिक प्रशासनाला बळकटी दिली आहे आणि ग्रामपंचायत विकास योजनांमध्ये सुधारणा झाली आहे. मालमत्तेच्या कायदेशीर मालकीने महिलांना अधिक आर्थिक आणि सामाजिक संरक्षण प्रदान केले जात आहे त्याच बरोबर मालमत्ता सर्वेक्षण अचूकपणे झाल्यामुळे मालमत्तेचे विवाद लक्षणीयरीत्या कमी झाले आहेत.

Powered By Sangraha 9.0