मुंबई : विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर उबाठा गटाने मिशन महापालिका सुरु केले आहे. दरम्यान, गुरुवार, २६ डिसेंबरपासून मातोश्रीवर बैठकांचे सत्र घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या बैठका पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लवकरच राज्यातील मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. उबाठा गटानेदेखील या निवडणूकांसाठी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. २६ ते २९ डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मातोश्रीवर मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. मातोश्रीवरील बैठकीत ते महानगरपालिका निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे.
हे वाचलंत का? - "अकेला देवेंद्र क्या करेगा? असं सुप्रियाताई म्हणाल्या होत्या, पण...;" मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार
या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. मात्र, उबाठा गट या निवडणूका स्वबळावर लढवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.