कझाकिस्तान येथे दुर्घटना! विमानाचा भीषण अपघात, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

    25-Dec-2024
Total Views |

Kazakhstan plane crash
 
अस्ताना : कझाकिस्तानातील अकातू विमानतळानजीक एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एकूण १०० प्रवासी आणि इतर ५ क्रू मेंबर हे विमानातून प्रवास करत होते. रशियाच्या प्रसारमाध्यमांनी या दुर्घटनेची माहिती दिली आहे. ही घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी घडली आहे. त्यापैकी एकूण १० प्रवासी वाचले असल्याचे सांगण्यात येत आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
कझाकिस्तानातील आणीबाणी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अजरबैजानचं विमान बाकू येथून रशियाच्या ग्रोजनी येथे जात होते. मात्र हवेतील धुक्यांमुळे विमानांचा मार्ग बदलला असल्याने विमान अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुर्घटनेमागील कारणाचा उलगडा अद्यापही समोर आलेला नाही. दरम्यान विमान दुर्घटना होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
 
व्हायरल झालेल्या संबंधित व्हिडिओत विमान हे हेलकावे देताना दिसत आहे. ते लँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहे. आकाशात एखादी पतंग उडते असेच ते एखाद्या पक्षाप्रमाणे गिरट्या घालताना दिसत आहे. यानंतर विमानाचा स्फोट झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यानंतर धुरांचे लोट घटनास्थळी दिसून येत आहेत.